Ad

Sunday, 30 October 2022

तृप्ती...

तृप्ती....

सखे...

सुखाच्या हिंदोळ्यावर
उंच उंच झुलताना...
रातीसुखाचा अवीट अनुभव
पुन्हा पुन्हा घेताना..
तुझ्या डोळ्यातील तृप्ती
तृप्त करते मला नखशिखांत

तुझ्या ओठांवर
माझ्या ओठांची मोहोर लागताना
मला जाणवते की,
हे ओठ माझेच आहेत...
तुझ्या ओठा वरचा तीळही
माझाच आणि माझाच..

ओठही दंश करतात तुझे
मग त्याचा विखार चढत जातो
उभ्या देहावर मनावर...
तुझा देह मग होऊन जातो
मदीरेचे उन्मादी पात्र...
किती पिऊ? आणि कसे पिऊ?

तुझ्या मानेवरचे रेशमी केस
अलगद बाजूला करून..
तिथे ओठ टेकवता टेकवता
अनावृत्त होत जातो ...
तुझ्या देहाचा रंगमंच...
आणि अनिमिष नेत्रांनी 
मी पहात बसतो तुझ्या देहाचे
देखणे नेपथ्य...

थरारून आणि शहारून जाते
माझे अधीर पौरुषत्व..
माझ्या असंख्य चुम्बनांची
बेभान फुलपाखरे उतरतात
तुझ्या मादक देहावर..

तुझ्या देहाचे मोहक उंचवटे
देखणे उन्मादी उतार..
फुलपाखरे सगळीकडे उतरतात
मग तुझेच फुलपाखरू होते..
आदिम सुखाच्या ओढीने 
लाजेला हद्दपार करून
बिलगतेस तू मला...

बिलगतेस कसली ग
माझ्या देहाच्या पेशींपेशींवर
मुलुखगिरी करत फिरतात
तुझे दाहक ओठ बेफामपणे
तू फक्त माझा आहेस ..
बोलते तुझी कातील नजर

त्या नजरेत काय नसत?
आसक्ती...मोह ..प्रेम
की पूर्णत्वाची अधीर ओढ?
 एक आदिम सुखाची ओढ
तुला न मला जवळ घेते
कसली ही ओढ?
कसली ही अस्वस्थता?
काहीतरी अपूर्ण तुझ्यात
काहीतरी अपूर्ण माझ्यात..

मग तू सैलावतेस
मला झेलण्यासाठी...
मग मी ही बेफाम
स्वार होण्यासाठी...
मग तो उन्मादी क्षण
पूर्णत्वाकडे नेणारा..
पूर्णत्वाच्या प्रवासातच
चढत जाणारी अवीट धुंदी
माझ्या पाठीवर उमटत जाणारी
तुझ्या नखा-क्षतांची नक्षी..

मदीरेचा प्याला भरत जातो..
नशा चढत जाते...
चुम्बनांचे डंख वाढत जातात
मी तुझ्यात खोल खोल
जात रहातो.. जात रहातो
या सुखाला अंत नसावा
आरंभ नसावा..
लांबी-रुंदी -उंची नसावी..
काळ देखील थांबावा..
दिशांचे पक्षी दिगंती झेपावे..
ही समाधी की ..?
डोपामाईनचे स्त्राव?
की धनभाराची...?
ऋणभाराकडे बेफाम धाव?

अन तो अलवार नितळ क्षण
मी तुझा ? तू माझी?
की एकच श्वास एकच कुडी?
एक देह दुसऱ्यात रुजलेला
की देहाला दुसरा देह झाला?

मिलनाचा एकच ध्यास
मिलनाचा एकच श्वास
मी काहीतरी दिलें
तू काहीतरी घेतले..
सृजनाचा एक क्षण
तुझ्या माझ्यात रुजलेला..

तुझे मिटलेले डोळे
अन माझे तृप्त श्वास
चुम्बनांचा सुरू झालेला
परतीचा प्रवास...
एक छान रितेपण मला आलेले
 तृप्तीचे अंकुर तुझ्यात रुजलेले

सखे....खरं ना?

☺️☺️☺️☺️

Tuesday, 25 October 2022

मी एकटा नाही...

मी एकटा नाही...

मी एकटा नाही..
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
माझ्यात डावा आहे,अन उजवाही..
एक सनातनी ,एक पुरोगामीही
एक अखंड कोलाहल 
माझ्यात चालू आहे कारण,
मी एकटा नाही...
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
येशू... बुद्ध ..कृष्ण 
लेनिन आणि मार्क्स 
कुणा एकाचे मंगळसूत्र मिरवत
एकांगी जगणे रुचत नाही 
मला पाचही जण  हवेतच सोबत ...
हे सोबत असले की जाणवतं
मी एकटा नाही...
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...

माझ्यात गर्दी असली तरी
 कळप-बिळप पसंत नाही मला
हत्तीचे-हरणांचे ,
कोल्ह्यांचे-लांडग्यांचे तसे 
माणसांचेही कळप
पुष्ट लोकांचे कळप,
तुष्ट लोकांचे कळप
माजलेल्या लोकांचे कळप
गांजलेल्या लोकांचे कळप
मी मात्र कळपात रहात नाही
कारण मला माहित आहे
माझ्यातच एक कळप आहे
म्हणूनच ....
मी एकटा नाही..
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...

कुणाच्या तरी ,वळचणीला रहाणे
अगदीच सुरक्षित...
कोणतातरी झेंडा घेणं
अगदीच सुरक्षित
प्रत्येक झेंड्याचे
 वेगळे तत्वज्ञान
 प्रत्येक झेंड्याला 
त्याचा त्याचा सन्मान..
कित्येक झेंड्याची अनेक बेटे
माझ्यात ऑलरेडी आहेतच
म्हणूनच मी एकटा नाही...
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
बेफाम,अनावर गर्दी
वेगळ्या रंगांची
 वेगळ्या ढंगाची
मोहक ,मादक, माजोरी गर्दी
अगदी  पार क्षितिजापर्यंत...
माझी वैचारिक तटबंदी तोडून
आत घुसू पाहणारी..
आक्रमक बेभान गर्दी..

कधी मोह कधी भय दाटून येत 
गर्दीत सामील होण्यासाठी
भय व्याकुळ त्या क्षणी
माझ्यातला येशू स्नेहाद्र सुरात
माझ्याशी बोलतो,क्षमा कर त्याना
ते जे काही करत आहेत ते कळत नाही त्याना..
.किंचित स्मित करून बुद्ध म्हणाला
 बन स्वतःचा मार्गदीप स्वतःच
 अत्त दीप भव ..अत्त दीप भव ..
विचारांचे सुदर्शन चक्र ..
मनात फिरायला लागते
आणि हृदयाच्या पिंपळपानावर
निवांत पहुडलेला योगेश्वर
तेच किंचित स्मित करत म्हणतो
कर्म कर फक्त कर्म कर..
.माझ्या खांद्यावर हात ठेवून 
मार्क्स आणि लेनिन म्हणतात
बेटा कर्म कर पण समाजासाठी
स्वार्थी नको होऊस इतकाही
त्याच क्षणी जाणवतं मी एकटा नाही...
मी एकटा नाहीमी एकटा नाही
माझ्यात गर्दी आहे अनेकांची...
हो गर्दी आहे अनेकांची....-

 प्रशांत शेलटकर  8600583846

Friday, 21 October 2022

लाखात एक देखणी...

लाखात एक देखणी...


पाहिले विशीत तिला
मी किती झालो दंग
पाहिले आताच तिला
उडाले ना सारे रंग...

रेशमी केस तिचे
किती रुपेरी जाहले
चेहऱ्यावर सुरकुत्यांचे
तळ किती हो पडले

मोहक मादक अदा
 तो बांधा  कमनीय
आताशा किती वाटते
 बघा किती हो दयनीय

बळे बळे तारुण्याला
ती धरू धरू पाहते.
थरावर थर मेकपचे
ती लावू लावू पाहते

परी ते दिसते किती
पहा पहा विचित्र
शोभा पाहताच ती
विस्फारले मम नेत्र

सखे ऐकशील का 
क्षणभर ग माझे
फेकून दे ग ते
भूतकाळाचे ओझे

जशी आहेस तशी तू
मान्य कर ग स्वतःशी
एकांती बोल ग 
बोल ना तू मनाशी

तुझ्यासमोर चालती
तुझे कौतूक सोहळे
पाठ फिरता तुझी
चेष्टाच करता सगळे

दिसणे हे क्षणिक असते
क्षण ते केवळ माया
असणे चिरंतन असते
ते पाहिजे जपाया

दिसो सुरकुत्या त्या
तुझ्या ग चेहऱ्यावरी
हसता प्रसन्न त्या
गायब होती झडकरी

दिसू दे तुझे जगाला
तेजस्वी बुद्धी वैभव
निथळू दे तुझ्यातून
नित्य वात्सल्य भाव

दिसुदे तुझ्यातली
बेलाग अफाट शक्ती
मग जडेल ग जगाची
तुझ्यावर ग भक्ती

मग उमजेल तुझे तुला
तू तुझीच स्वामिनी
नजरेत तुझ्या तूच
 लाखात एक देखणी

- प्रशांत शेलटकर
8600583846

Wednesday, 12 October 2022

पुढे काय होणार????

पुढे काय होणार??????

या मालिका बघणे म्हणजे इतरांच्या घरात डोकावून पहाणे.. जे घराघरात चालते ते परत पडद्यावर काय पहायचे? हल्ली एक नवीनच ट्रेंड आहे. जवळपास प्रत्येक मालिकेत एक लहान तोंडी मोठा घास घेणारे एक लहान मूल असतंच.. ते काहीही बोललं तरी ते कान टवकारून ऐकायचं असत...बाकी मसाला तोच असतो..सासू सून, ..एकत्र कुटुंब...ती  कारस्थाने...ते शह -काटशह..तो अश्रूपात.. ते  अमृतपानाच्या पंगतीत देवांचे रूप घेऊन राहू आणि केतू घुसले होते ना तसेच कुटुंबात घुसलेले उपखलनायक...आणि शेवटी लांबलेला सत्याचा विजय पाहण्यासाठी आसुसलेले हजारो डोळे...
     पूर्वी दूरदर्शन मालिकांचा शेवट पण दिमाखदार व्हायचा ...कारण  लिमिटेड एपिसोड... त्यामुळे त्या मालिका शेवटाकडे जाताना गावसकरच्या  निवृत्तीचा दिमाख होता.. दामिनी मात्र कपिलदेवच्या निवृत्ती सारखी रखडली होती..
     आताच्या मालिका अमृत प्राशन केल्या सारख्या अमर होऊन आलेल्या असतात...संपतच नाहीत. मग त्या कंटाळवाण्या होतात.. कुठून सुरवात केली होती हे खुद्द लेखकालाच समजत नाही..टी आर पी साठी कथानकाला वाट्टेल ती वळणे दिली जातात..तीच तीच दळणे दळली जातात. खलनायकाने नायक अथवा नायकाला पिचून काढावे..अनेक एपिसोड धोबीघाटावर सुकत घातल्यावर   वळणे देत देत मालिका शेवटाकडे आली आली आणि खलनायकाच्या अंत झाला की काय दुर्बुद्धी होते की बेंबीत बाण मारलेला रावण हा हा हा करीत पुन्हा जिवंत व्हावा ना तसे या खलनायकाला परत धुमारे फुटतात...
      आणि आमचे भाबडे प्रेक्षक परत सरसावून बसतात...
पुढे काय होणार याची वाट बघत...

- प्रशांत शेलटकर
  8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...