Ad

Sunday, 30 October 2022

तृप्ती...

तृप्ती....

सखे...

सुखाच्या हिंदोळ्यावर
उंच उंच झुलताना...
रातीसुखाचा अवीट अनुभव
पुन्हा पुन्हा घेताना..
तुझ्या डोळ्यातील तृप्ती
तृप्त करते मला नखशिखांत

तुझ्या ओठांवर
माझ्या ओठांची मोहोर लागताना
मला जाणवते की,
हे ओठ माझेच आहेत...
तुझ्या ओठा वरचा तीळही
माझाच आणि माझाच..

ओठही दंश करतात तुझे
मग त्याचा विखार चढत जातो
उभ्या देहावर मनावर...
तुझा देह मग होऊन जातो
मदीरेचे उन्मादी पात्र...
किती पिऊ? आणि कसे पिऊ?

तुझ्या मानेवरचे रेशमी केस
अलगद बाजूला करून..
तिथे ओठ टेकवता टेकवता
अनावृत्त होत जातो ...
तुझ्या देहाचा रंगमंच...
आणि अनिमिष नेत्रांनी 
मी पहात बसतो तुझ्या देहाचे
देखणे नेपथ्य...

थरारून आणि शहारून जाते
माझे अधीर पौरुषत्व..
माझ्या असंख्य चुम्बनांची
बेभान फुलपाखरे उतरतात
तुझ्या मादक देहावर..

तुझ्या देहाचे मोहक उंचवटे
देखणे उन्मादी उतार..
फुलपाखरे सगळीकडे उतरतात
मग तुझेच फुलपाखरू होते..
आदिम सुखाच्या ओढीने 
लाजेला हद्दपार करून
बिलगतेस तू मला...

बिलगतेस कसली ग
माझ्या देहाच्या पेशींपेशींवर
मुलुखगिरी करत फिरतात
तुझे दाहक ओठ बेफामपणे
तू फक्त माझा आहेस ..
बोलते तुझी कातील नजर

त्या नजरेत काय नसत?
आसक्ती...मोह ..प्रेम
की पूर्णत्वाची अधीर ओढ?
 एक आदिम सुखाची ओढ
तुला न मला जवळ घेते
कसली ही ओढ?
कसली ही अस्वस्थता?
काहीतरी अपूर्ण तुझ्यात
काहीतरी अपूर्ण माझ्यात..

मग तू सैलावतेस
मला झेलण्यासाठी...
मग मी ही बेफाम
स्वार होण्यासाठी...
मग तो उन्मादी क्षण
पूर्णत्वाकडे नेणारा..
पूर्णत्वाच्या प्रवासातच
चढत जाणारी अवीट धुंदी
माझ्या पाठीवर उमटत जाणारी
तुझ्या नखा-क्षतांची नक्षी..

मदीरेचा प्याला भरत जातो..
नशा चढत जाते...
चुम्बनांचे डंख वाढत जातात
मी तुझ्यात खोल खोल
जात रहातो.. जात रहातो
या सुखाला अंत नसावा
आरंभ नसावा..
लांबी-रुंदी -उंची नसावी..
काळ देखील थांबावा..
दिशांचे पक्षी दिगंती झेपावे..
ही समाधी की ..?
डोपामाईनचे स्त्राव?
की धनभाराची...?
ऋणभाराकडे बेफाम धाव?

अन तो अलवार नितळ क्षण
मी तुझा ? तू माझी?
की एकच श्वास एकच कुडी?
एक देह दुसऱ्यात रुजलेला
की देहाला दुसरा देह झाला?

मिलनाचा एकच ध्यास
मिलनाचा एकच श्वास
मी काहीतरी दिलें
तू काहीतरी घेतले..
सृजनाचा एक क्षण
तुझ्या माझ्यात रुजलेला..

तुझे मिटलेले डोळे
अन माझे तृप्त श्वास
चुम्बनांचा सुरू झालेला
परतीचा प्रवास...
एक छान रितेपण मला आलेले
 तृप्तीचे अंकुर तुझ्यात रुजलेले

सखे....खरं ना?

☺️☺️☺️☺️

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...