कोण पुढे कोण मागे?
सगळे गोल गोल फिरतात
मीच सर्वात पुढे म्हणून
उगाच मात्र गमजा करतात..
मीच मोठा बुद्धिवान
बाकी सगळे येडे...
चार चौघात उगाच धावे
माझ्या अकलेचे घोडे.
मी मोठा बॉस
बाकी माझे गुलाम
घरात आणि ऑफिसात
सगळे करती सलाम
मी बोलतो इंग्रजी
मलाच कळतात मॅनर्स
मराठीतून बोलतात फक्त
मॅनर्सलेस जोकर्स....
कधीच कोणाला म्हणू नये
तू किस झाड की पत्ती
नियतीच मग देते मग
अहंकाराला तुमच्या बत्ती
मेंदू ज्याचा आहे शाबूत
तो प्रत्येक बुद्धिमान आहे.
प्रत्येकाचे क्षेत्र मात्र,
अगदी भिन्न भिन्न आहे.
असतो कोणीतरी कनिष्ठ
म्हणून कोणी श्रेष्ठ आहे.
बुद्धी असो वा असो श्रम
इथे प्रत्येक ज्येष्ठ आहे..
सत्ता संपत्ती आणि सुंदरतेचा
माज कधी करू नको..
रावाचा होतो क्षणात रंक
हे कधी विसरू नको..
सगळंच कळतं ज्याला असा,
माणूस कधी झालाच नाही
सगळंच कळतं ज्याला असा,
देवाशिवाय कोणीच नाही
-प्रशांत शेलटकर
8600583846