कैफ
चिअर्स तर कधीच केलं
पण आता कुठे हलकं झालं
ग्लास अर्ध सरल्यावर..
आता आयुष्य कळायला लागलं
एकेक सिप मारावा,
तसे दिवस वर्षे संपून गेली
अन ग्लासाच्या तळाशी
थोडी मदिरा उरून गेली
टल्ली व्हायचे गणित इथे
प्रत्येकाचे वेगळे आहे...
ग्लास तेच असले तरी
ब्रँड मात्र वेगळे आहे..
एकेक पेग घ्यावा तसे
आयुष्य रिचवीत गेलो
चकन्या सोबत दर्द माझा
निमूटपणे गिळत गेलो
सोबतीही निघून गेले
आता फक्त चकना उरला
आयुष्यही सरुन गेले...
आता फक्त कैफ उरला
प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment