Ad

Saturday, 18 January 2020

कसं वागावं?

वया प्रमाणे वागावं
म्हणजे नेमकं काय करावं?
कपाळावर आठ्या ठेऊन
चौकोनात जगावं?

एरंडेल प्यावं की
कायमचूर्ण घ्यावं?
 की चेहरा लांब करून
जगाला भ्याव?
वया प्रमाणे वागावं
म्हणजे नेमकं काय करावं?
कपाळावर आठ्या ठेऊन
चौकोनात जगावं?

मनसोक्त जगावं की
आकड्यात अडकाव?
गेलेल्याला रडावं की
आलेल्याला हसावं?
वया प्रमाणे वागावं
म्हणजे नेमकं काय करावं?
कपाळावर आठ्या ठेऊन
अस चौकोनात जगावं?

जगण्याचं गाणं व्हावं की
मृत्यूच रडगाणं गावं?
हसत हसत जगावं की
मरणानंतरही जगावं?
वया प्रमाणे वागावं
म्हणजे नेमकं काय करावं?
कपाळावर आठ्या ठेऊन
अस चौकोनात जगावं?

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...