Ad

Friday, 31 January 2020

ताई

ताई.

धर्मशाळेच्या कोपऱ्यावर
ती उदास बसली होती
पांढरी साडी अंगावर अन
नजर तिची थिजली होती

केस होते मोकळे अन
अश्रू गाली सुकले होते
काजळ होते विस्कटलेले
कुंकू अर्धे पुसले होते..

दया आली मला तिची
म्हटलं ताई काय झाले
घरी नाही का जायचे?
रात्रीचे बारा वाजले..

ती हसून म्हणाली मला
भाऊ काय रे आहे घाई
विहिरीत फार उकडतं
म्हणून बाहेर आले बाई

फणी आहे का रे भाऊ
तिने मला विचारले,
अन डोके काढुन स्वतःचेच
केस विंचरायला घेतले

हातातले मस्तक तिच्या
असे काही हसले,
तोंडातले दात तिच्या
पायापाशी पडले...

म्हणाली दे ना जरा
ब्रश त्यांना करते,
नाश्त्याची वेळ झाली
तुला आता धरते.

सुसाट तिथून पळालो
अन घरी थेट आलो.
आता ब्रश करताना
हात मात्र थरथरतो

कधी केस विंचरताना
डोके हाती घ्यावे वाटते
अन रात्री बारा वाजले की
मला माझी ताई आठवते

😃😃😃😃😃😃😃

प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...