Ad

Wednesday, 22 January 2020

प्रपोज

ती त्याला म्हणाली,
उद्या बागेत भेटू....
तो म्हणाला तिला,
हो नक्कीच भेटू...

ठरल्याप्रमाणे ती ,
त्याला बागेत भेटली
पण त्याच्या ओठांना
मौनाची बेडी बसली

ती लाजली
तो ही लाजला
दोघांना लाजताना बघून
बागेतला मोगरा हसला

कुणी तोडावी मौनाची बेडी
काही केल्या ठरेच ना
अन त्याच्या तोडून काही
शब्दच काही सुटेना...

पुढाकार कोणी घ्यावा
इथे सार अडलं..
तिच्या मनात काय याच
कोड त्याला पडलं...

धीर करून निकराचा
तो तिला म्हणाला..
कुठे काय म्हणाला?
तिला फक्त भास झाला

काही म्हणालास का तू?
काळीज तिचे बोलले...
तिच्या एका प्रश्नाने
काळीज त्याचे हलले...

बोलला तो काहीच नाही
डोळे फक्त बोलले..
अन शब्दावाचून काळीज त्याचे
क्षणात तिला कळले...

स्तब्ध झालेली बाग मग
कशी धुंदफुंद झाली..
अबोलीची फुल मग
किती बर बोलकी झाली

गालावरची लाली तिच्या
गुलाबाने चोरली...
अन का कोण जाणे कशी
बकुळीला अवचित फुले आली


त्यानं पाहिलं तिच्याकडे
तीन पाहिलं त्याच्याकडे
किती अलगद सुटले ना
किती दिवसाचे कोडे....

तिच्या डोळ्यात तो अन
त्याच्या डोळ्यात ती
जणू तो ओंजळ अन
ती त्याची पणती...

विसावली मग ती त्याच्या 
अलगद अशी खांद्यावर
दोघेही मग झुलू लागली
अदृश्य एका झुल्यावर...



.....

....

आता त्याच्या हातामध्ये
तिचा नाजूक हात आहे
तुमचं आणि आमचं सांगा
बागेत काय काम आहे?

😀❤😀❤😃❤

/प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...