निसटलेले क्षण
निसटू द्यावे...
विस्कटलेले आयुष्य
विस्कटू द्यावं...
शाश्वत तर काहीच नाही
जे न झालं आपलं कधीच
ते अलगद सोडून द्यावं...
जे आपले मानले
तेच सोडून गेले...
हिशेब त्यांनी ,
चुकते केले...
त्यांना तसेच जाऊ द्यावं
जे न झालं आपलं कधीच
ते अलगद सोडून द्यावं...
ज्यांना यायचंच नसत
ते कधीच येत नाहीत
ज्यांना जायचंच असत
ते कधीच थांबत नाहीत
जायचय त्यांना जाऊ द्यावं
यायचंय त्यांना येऊ द्यावं
जे न झालं आपलं कधीच
ते अलगद सोडून द्यावं...
कारण असल्याशिवाय
कोणी जवळ येत नाही
तारण असल्याशिवाय
कोणी काही देत नाही
जाता जाता आयुष्याला
एक छानसं स्माईल द्यावं
जे न झालं आपलं कधीच
ते अलगद सोडून द्यावं...
-प्रशांत शेलटकर
8600583846