आयुष्य एक पेच आहे
हे जगणे तेच तेच आहे
मागचा नेहमीच शहाणा
पुढच्यास मात्र ठेच आहे..
हे जगणे व्हावा एक सोहळा
असे कधी जगणे झालेच नाही
हसणे झाले मुश्किल आणि
रडणे मात्र रोज तेच आहे..
आखलेले बेचव जगणे
भूमितीत बांधलेले...
आयुष्य फक्त लांबलेले
खोलीचे माप तेच आहे
तीच माणसे गांजलेली
तीच तत्वे गंजलेली..
विठूच गेला वैकुंठाला
बडवे मात्र तेच आहे..
तीच जनता तेच नेते
तेच प्रश्न तीच उत्तरे
तेच गाजर तीच वचने
फसणेही तेच तेच आहे
-प्रशांत
No comments:
Post a Comment