Ad

Tuesday, 24 September 2019

माणसे

चार पैसे आले की
बदलतात माणसे...
रंकाचे राव होताना
बदलतात माणसे..

दमडी नसताना खिशात
भलतीच नम्र होतात माणसे
तोच खिसा भरला की
माजोरी होतात माणसे...

नसते कोणीच जवळ तेव्हा
ओळख दाखवीती माणसे
मग गर्दीत धनवानांच्या
अनोळखी होतात माणसे

जिथे शारदा रमे लक्ष्मी सह
तिथे नांदती साधी माणसे..
जिथे केवळ नांदते लक्ष्मी
तिथे केवळ धनवेडी माणसे

आज राव उद्या रंक हे
जी जाणती माणसे
तीच प्रिय होतात जनीं
अन्य केवळ अज्ञानी माणसे

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

कुंपणावरच्यास

कुंपणावरच्यास.... भलताच बिझी मित्रा पण स्टेटस मात्र बघतो कळते मला अरे वेड्या तू अंदाज मात्र बांधतो.. बंद करतोस दरवाजा  अन् खिडकी उघडी जराशी ...