जसा आहेस तसा...
इस्त्री तुझ्या चेहऱ्याची
विस्कटू दे ना जरा
जसा तू आहेस तसा
दिसू दे ना जरा....
कशास हवीत रे बंधने
आपल्याशीच बोलताना
झुगारून खोटी बंधने
मोकळा हो ना जरा...
जसा तू आहेस तसा
दिसू दे ना जरा....
बोललास काही वावूगे
खंत नाही जराही मला
बोललास रे खरेखुरे
यात आनंद लपला खरा
जसा तू आहेस तसा
दिसू दे ना जरा....
बोल तू तुटके फुटके
शब्दांत हो जरा मोकळा
संवाद साधण्यास का रे
लागतो इमोजीचा आसरा
जसा तू आहेस तसा
दिसू दे ना जरा....
कधी वाटले हसावेसे
तर मनसोक्त हस जरा
दाटून आले आभाळ जर
मनसोक्त असा बरस जरा
इस्त्री तुझ्या चेहऱ्याची
विस्कटू दे ना जरा
जसा तू आहेस तसा
दिसू दे ना जरा....
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment