प्रत्येकवेळी बोललं पाहिजे
अस काही नसतं..
गर्दीत चालताना तुझा हात
हातात घेणं पुरेस असतं..
प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
असं काही नसतं...
गालावर आलेली तुझं बट
अलगद बाजूला करणं पुरेस असतं
प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
असं काही नसतं...
कधी कधी तुला फक्त,
डोळ्यात साठवणे पुरेसं असतं
प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
असं काही नसतं...
तुझा हात हातात घेऊ
तो स्पर्श अनुभवणं पुरेसे असतं
प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
असं काही नसतं...
कधी तुझ्या ओठांना
ओठांनीच टिपणं पुरेसं असतं
प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
असं काही नसतं...
कधी कधी असं मौनातच
मुग्ध असणं पुरेसं असतं
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment