Ad

Wednesday, 4 March 2026

माघार...

माघार..

सुखाच्या वेदना अंगभर पसरल्या 
मग दुःखच होते ते बरेच होते..
सुखाच्या हुलकावण्या पुरे झाल्या
मग दुःखच होते ते बरेच होते..

क्षणभर वाटते जरा बरेसे 
तरी चिरदाह हा शमता शमेना 
बस नको फुंकर कोणाची आता
वणवा होता तो बरेच होता..

कशास सांगाव्या वेदना कोणा 
ते चुकचुकणे वाटते नकोसे..
समजावणे स्वतःचे स्वतःला
बोलणे स्वतःशी ते बरेच होते..

फक्त कोरडे स्पर्श इतके इथले
फक्त शब्द भरजरी किती इथले
मौनात किती मी बोलतो स्वतःशी
एकांती होतो ते किती बरेच होते.

आता नको पुढे जाणे पुन्हा
जरी मोहक वाटा खुणावती 
रक्त माझे वेदनाही माझ्या
काट्यात चालणेच ते बरे होते...

@ प्रशांत

No comments:

Post a Comment

मित्राचे अध्यात्म

परवा जाता जाता रस्त्यात भेटला एक मित्र वरती बोट करून म्हणाला तिथूनच हलतात सूत्र... बायका ,पोरे ,मित्र वगैरे सगळी आहे माया  असेल तुझ्याजवळ का...