देवाची गंमत..😀😀
देव नावाच्या मित्राच्या घरी जाताना काय म्हणाल?
😀-देवा घरी जातोय..
त्याच्या घराबद्दल माहिती नसेल तर काय म्हणाल?
😀-देवाघरचे ज्ञात कुणाला?
दीनानाथ नावाच्या मदतीला त्याचा मित्र आला.
😀- देव दीनाघरी धावला
देव नावाचा मित्र हरवला तर??
😀- देव देव्हाऱयात नाही देव नाही देवालयी.. देव शोधून पाहे अशी कोणाची पुण्याई?
देव नावाच्या मित्र दागिने बनवायला सोनाराकडे गेला तर सोनार देवाला काय म्हणेल?
😀-देवा तुझा मी सोनार...
देव नावाचा मित्र रुसून बसला तर त्याची आई काय म्हणेल?
😀- नको देवराया अंत असा पाहू
देव नावाच्या मिसळ वाल्याला काय सांगाल?
😀-देवा मला पाव (दे) अणि कट (इथून)
देवांचे गाव
😀- देवस्थळी
देवांच्या बागेला काय म्हणाल?
😀-देव राई
देव नावाच्या सरकारी नोकराला
अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर दिवंगत श्रीराम लागू काय म्हणाले असतें?
😀- देवाला रिटायर करा.
माहेरी आलेली मुलगी देव नावाच्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिला काय म्हणतील
😀- मुलगी देवा घरी गेली ते देवाघरचेच देणे होते
@ प्रशांत 😀
No comments:
Post a Comment