Ad

Wednesday, 31 December 2025

तोच दिवस तीच रात्र

तोच दिवस तीच रात्र...

तोच सूर्य तोच दिवस 
काही नाही बदलणार 
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार..

तीच नोकरी तोच धंदा
तोच बॉस तिथेच असणार
सेलिब्रेशनला फक्त निमित्त
दुसरं काय कारण असणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

तीच बायको तोच नवरा 
त्याच त्याच तक्रारी असणार 
तोच पोलीस तिच शिट्टी
दुसरं काय अजून वाजवणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

तेच आमदार तेच खासदार
त्याच योजना तेच सरकार
मागच्या वर्षीचे तेच दळण
दुसरं काय अजून दळणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

त्याच फॉरवर्डेड शुभेच्छा
त्याच त्याच पुढे पाठवणार..
अणि मेमरी फुल्ल म्हणून
आणखी काय नवीन होणार
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

म्हणून सांगतो आता मित्रांनो
आता अगदी शांत झोपणार
काल रात्री सुद्धा वाजले बारा 
आज काय तेरा वाजणार?
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार...

तोच सूर्य तोच दिवस 
काही नाही बदलणार 
कॅलेंडरचे फक्त एक पान
उलटून आता दुसरे येणार..

@ प्रशांत😄😄😄

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...