क्रांती का होत नाही?
सगळी चिडचिड,असंतोष,नाराजी,सोशल मीडियावर व्यक्त होऊन डिफ्युज होते..
समाज एक होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रचंड काळजी घेतात.
समाज पूर्णपणे वंचित होऊ नये याची दक्षता घेतली जाते.पूर्ण उपाशी पोट क्रांती करते. अर्ध भरलेले पोट कधी तरी पूर्ण भरेल या आशेवर दिवस काढत बसते.
समाजातील बुद्धीवादी वर्ग अंकित ठेवला जातो.
बेसिक प्रश्नाभोवती समाज फिरत ठेवला तर तो त्यातच गुंतून जातो.बेसिकच्या पलिकडे सुद्धा प्रश्न असतात याचे भान जाणीवपूर्वक काढले जाते.
सत्तापालट होण्याचा दिवस एकच असल्याने त्याच्या अगोदर काही महिने विकासाची कामे करून मागची साडेचार वर्ष जनतेच्या मनातून पुसली जातील असे नियोजन आणि कृती केली जाते,
जात आणि धर्म याचा टूल म्हणून वापर होतो.
भोगाची सवय लाऊन क्रांतीच्या ठिणग्या विझवल्या जातात.
उपद्रव मूल्य गटांना शांत केले जाते.
जीवनातले स्थैर्य माणसाला मंद बनवते.
आणि शेवटचे...
मला काय त्याचे? ही वृत्ती क्रांतीच्या मुळावर येते..
प्रशांत
No comments:
Post a Comment