प्रश्न...????
निमाव्या देहजाणिवा
पार्थिवाचा मोह दिगंती..
पण थरथरतो विवेकही
कशी लागावी संगती...
रुजून आल्या भावना
मातीतूनच जनुकाच्या
जळता जळेना जुनाट
या गाठी संचिताच्या..
साधनेचे शुन्य संचित
तरी नाव लोटली पुरात
ना देती दिशा इशारा
तरी भरला वारा शिडात
प्रश्नपक्षी आभाळभर
एकासही ना घरटे परंतु
किती उत्तरे मिळाली तरी
मनात उरतोच किंतु..
उत्तराचे मोह कशाला?
प्रश्नच उरावे भोवती
माझ्या जितेपणाची
हीच खूण शेवटी...
@प्रशांत
No comments:
Post a Comment