Ad

Thursday, 25 December 2025

दादा...

दादा....

कुठे चालली दिंडी 
ठाव तिचा नाही..
विटेवर आज माझा
विठ्ठल मात्र नाही....

संथ चालती पाऊले
टाळ झाले मुके..
ओलावा निघून गेला
डोळे झाले सुके..

तुटली नाती आता
कोरडीच रे माया..
विठ्ठला तुझ्याविना 
जीव उठतो खाया

माय गेली बाप गेला
गेला आधारवड
उडून गेले सर्व पक्षी
उभे कसे तरी खोड

पांगले वारकरी आता
तुटली त्यांची हो नाळ 
चालतो एकटाच मी
संथ वाजवित टाळ 

मनातला विठ्ठल माझ्या
मनात हो जागा
हृदयाच्या विटेवर
बाप माझा उभा..

@ प्रशांत..

( कै दादांच्या स्मृतीस समर्पित..)

No comments:

Post a Comment

मित्राचे अध्यात्म

परवा जाता जाता रस्त्यात भेटला एक मित्र वरती बोट करून म्हणाला तिथूनच हलतात सूत्र... बायका ,पोरे ,मित्र वगैरे सगळी आहे माया  असेल तुझ्याजवळ का...