तंत्रजीवी..
व्यस्त कोणी नसतो हो
उगाच आपल काहीतरी
अग्रक्रम आपले ठरलेले
सबब आपली काहीतरी
मीटिंग आहे,काम आहे
असतात फक्त बहाणे
टाळायचे कसे तुम्हाला
विचार करतात शहाणे
सोशल वर्क? शी बाई
भिकेचेच बाई डोहाळे
त्यापेक्षा किटी पार्टीचे
रम्य किती ग सोहळे
मी आणि माझच विश्व
बाकीच्यांना नो एन्ट्री
माझं वर्तुळ माझा परीघ
मीच त्याचा सेंट्री..
माणसं यंत्राळली आता
आणि यंत्र माणसाळली
माणूस झाला तंत्रजीवी
माणुसकी मात्र ओशाळली
@ प्रशांत
No comments:
Post a Comment