Ad

Saturday, 12 July 2025

इयत्ता

इयत्ता...

उंट, हत्ती, बेडूक माकड
गेले एकदा शाळेत..
मास्तर म्हणाले पास व्हायचं तर
उतरावं लागेल स्पर्धेत..

शाळेच्याच कोपऱ्यावर
उभे होते एक उंच झाड
फ़ांद्या फ़ांद्यात गुंतलेले
तरी उंचच उंच वाढ..

झाडापाशी जाऊन मास्तर
म्हणाले पोरांनो नीट ऐका
जो चढेल झाडावर पटकन
त्याचाच नंबर पहिला बरं का

झाडाकडे पहात पहात
सरेंडर झाला उंट
म्हणाला मी सोडतो शाळा
करू नका मला काउंट..

कसे चढावे झाडावर
हत्ती विचारात पडला
सोंडेनेच नकार देत
शाळे बाहेर पडला..

जेमतेम जेमतेम बुंध्याशी
पडली बेडूक उडी.
डराव डराव करीत रागाने
बाहेर पडला गडी

आता उरलं एकच माकड
सर सर गेले टोकावर
मास्तरांनी घोषित केले
माकड पहिला नंबर..

वर्षानुवर्षे हेच चालू
सब घोडे बारा टक्के
तेच निकष तेच निष्कर्ष
गुणवत्तेचे निदान पक्के

उंट, हत्ती, बेडूक माकड
प्रत्येक जण युनिक आहे.
जिकते का नेहमीच माकड
निकषात त्याचे उत्तर आहे

शाळेबाहेरच्या  शाळेतच
फुलून येते खरी गुणवत्ता
कळून येते तेव्हाच खरी
खरी खरी आपली इयत्ता

-प्रशांत ❤️

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...