माणूस का निर्माण झाला असावा? सखोल विचार केला तर माणूस हा निसर्गाचा भाग असूनही तो निसर्गाला जाणून घेतो म्हणजे स्वतःलाच जाणून घेतो.. हे बाह्य विश्व अनंत आहे त्याहूनही आतले विश्व अफाट आणि अथांग आहे तरीही ते समजत असल्याचा दावा विज्ञानवादी करतात आणि ते पुर्ण समजल्याचा दावा अध्यात्मवादी करतात.. खरं तर दोघेही आपल्या आपल्या समजुतीत असतात.. दोघांच्याही निष्कर्षांच्या निकषाचा पाया सत्य आहे हे त्यानी गृहीत धरलेले असते. अनुभूती हा निकष दोघांमध्ये सारखा असला ती घेण्याचे मार्ग भिन्न असतात.. आणि अनुभूतीला देह आणि मन याची मर्यादा असते.. म्हणून माया हे सत्य असू शकते आणि सत्य ही माया असू शकते
-प्रशांत
No comments:
Post a Comment