✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
लाडकी बहीण आणि मॉब सायकॉलॉजी -(समूह मानस शास्त्र)
सभेत एक टाळी वाजली की हजारो टाळ्या वाजायला लागतात,
दंगलीत एकाने दगड उचलला की हजारो हात दगड उचलतात
स्टेडियम मध्ये जेव्हा प्रेक्षकांचा एक गट मेक्सिकन वेव्हज आणतो तेव्हा ती वेव्हज संपूर्ण स्टेडियम व्यापते
पानिपतात विश्वास रावाला गोळी लागते, सदाशिव भाऊ दिसेनासे होतात आणि मराठे जिंकत आलेले युद्ध हरतात..
ही सर्व मॉब सायकॉलॉजी किंवा समुहाच्या मानस शास्त्राची उदा हरणे आहेत,
व्यक्तीला विवेक, बुद्धी, तर्क असतात, समूहात हे सगळं क्षीण होतं. त्याची जागा भावना घेतात.. समूहाला एक मन असत त्याचा आय क्यू कमी आणि इ क्यू म्हणजे भावनांक जास्त असतो.
जेव्हा बाजारात सेल लागतात तेव्हा गर्दी होते ती याच कारणाने. होते..गर्दीच एक सामूहिक मन तयार झाल्या मूळे व्यक्तीगत मनाचा लोप होतो किंवा ते समूह मनाशी लिंक होते. जे समूह करेल ते व्यक्ती करू लागते
लाडकी बहीण ह्या योजनेचे मानस शास्त्रीय विश्लेषण करून बघा..
सुरक्षित रहाणे आणि आनंद घेणे ह्या बेसिक भावना आहेत.या दोन्ही भावना लाडक्या बहीण योजनेत आहेत. शासन देतय ना मग ते घेतले पाहिजे या भावनेने कितीतरी सुखवस्तु बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.एकीला मिळाल की दुसरीला असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटायला लागतं.
ती घेते मग मी का नाही? सगळे घेतात मग मी का नाही? या विचाराने अस्वस्थ होतं जातात.माझ्याजवळ पुरेसे असताना मी केवळ मोफत मिळते म्हणून घेणार का..यात विवेक कुठे आहे? तारतम्य कुठं आहे?
एकदा आपल मन समुहाच्या ताब्यात दिल की ते बेसिक भावनांचा विचार करते.विवेक तर्क बाजूला ठेवते याच हे एक उदाहरण आहे..
-© प्रशांत शेलटकर✒️
No comments:
Post a Comment