Ad

Thursday, 5 June 2025

तथ्य-(लेख)

तथ्य-1 


पूर्वी राजेशाही होती आताही राजेशाहीच आहे.. फरक इतकाच की पूर्वी ती वंशपरंपरेने मिळायची आता लोकशाही मार्गाने मिळते..मतपेटी जुने राजे निवडते किंवा नवीन राजे निवडून देते..पण निवडून देते ते राजेच...क्वचित एखादा साधा माणूस निवडून दिला तर तो पाच वर्षात राजा होतो..


तथ्य-2

सत्तेत येणे हेच राजकीय पक्षाचे ध्येय असते, जनसेवा हा सत्तेत येण्याचा एक मार्ग आहे . सत्ता मिळवणे हे एकच ध्येय असल्याने विरोधक संपवणे यात गैर नाही.जे संपण्याच्या लायकीचे असतात ते संपतातच हा डार्विन चा सिद्धांत राजकारणाला देखील लागू आहे. राजकारण हे नेहमीच निर्मम राहिले आहे.आणि कार्यकर्ते हळवे.

तथ्य-3

पंथ (धर्म नव्हे) ही एक फसलेली व्यवस्था आहे. प्रेषितांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी काही वर्षातच पंथ ताब्यात घेतात आणि मूळ उद्देश भरकटत जातो आणि त्याला कर्मकांडी रूप येते.प्राण्याचा माणूस बनवता बनवता माणसाचे प्राणी करण्याचे अद्भुत सामर्थ्य पंथामध्ये असते. जेवढे अत्याचार धर्म स्वीकारावा म्हणून झालेत तेवढेच अत्याचार धर्म नाकारावा म्हणून झालेत.कोणी कोणास नावे ठेऊ नयेत

तथ्य-4

अमुक एका विचारसरणीचा असणे म्हणजे एका साच्यात स्वतःला बंदिस्त करून घेणे होय.एक विचार स्वीकारणे म्हणजे अन्य विचार नाकारणे.अन्य विचार नाकारणे म्हणजे माणसाला नाकारणे. आयुष्यभर एकाच विचारांचे असणे म्हणजे भूषण नव्हे..याचा अर्थ असा की आयुष्यभर तुमच्या मेंदूने एकाच पद्धतीने विचार केला आहे.विज्ञान जर बदलत जाते तर माणसाने पण बदलत जाणे नैसर्गिक आहे.


-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...