Ad

Thursday 30 May 2024

मनातलं..#-१

मनातलं..#-१

एकदा का एखाद्या माणसाचा हेतू लक्षात आला की त्याच्याशी प्रतिवाद करण्यात अर्थ नसतो..वैचारिक धारणा ,स्वमत बनण्याचे एक वय असते, ते उलटून गेले की माणसाचे मन एक मशीन बनते.. त्यातून एकसाची आऊटपुट बाहेर पडत रहातो.. तिथे वेगळी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसतो..अशा एकसाची माणसांचा एक समूह बनतो,ते एकमेकांची पाठ थोपटत रहातात. एकमेकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत बसतात.समूहाबाहेरील कोणी चुकून वेगळा व्यक्त झाला तर टोचून टोचून त्याला हैराण करतात..इनपुट तोच,प्रोसेस तीच त्यामुळे आउटपुट पण तोच..फार थोडी माणसं असतात की जी लहान मुलाच्या उत्सुकतेने जग पहातात..तटस्थ विचार करतात..त्यांच्या कपाळावर ना कोणता टिळा असतो ना त्यांच्या खांद्यावर  कोणता झेंडा असतो..त्यांची त्यांची जीवनसाधना ते करत असतात..आपल्या नकळत त्यांचा व्यष्टी ते समष्टी प्रवास चालू असतो ..त्यांच्यात कृष्णाचा कठोर कर्मसिद्धांत आणि बुद्धाची असीम करुणा एकाच वेळी वास करत असते. शाब्दिक कसरती न करता सम्यक कृती करून त्यांचे त्यांचे जीवन ते जगत असतात..पूर्वग्रह आणि अहंकार सोडला अशी माणसं दिसून येतात..अहंकाराचा सूर्य मावळल्याशिवाय निरामय शांतीचा चंद्रमा नजरेस पडत नाही...

😊 प्रशांत

No comments:

Post a Comment

कोकनी..

कोकनी...😊 मी नाय भक्त आनी मी नाय चमचा खावन पिवन सुखी  भात आनी लोनचा हैसून येता पाकीट थैसून येता पाकीट टोपी खय कोनास ठाव उरला फक्त जाकीट हैस...