अ. ल.क. ( अति लघु कथा)
सूर्यनमस्कार -१
....डोळे चोळत चोळत टेरेसवर गेलो..स्वतःला सूर्याकडे सेट केलं..सुरवात केली..ओम मित्राय नमः
सूर्य हड म्हणाला.. दुपार साठी राखून ठेवलेला एक जळजळीत किरण माझ्यावर फेकून तो ढगाआड गेला..
इकडे पृथ्वीलोकात मी तीन सुर्यनमस्कारात आटपलो होतो..सूर्य ढगाबाहेर आला तेव्हा टेरेसवर कुणीच नव्हते...
इकडे खाली मला बाथरूम मध्ये " आला मोठ्ठा..नमस्कार घालणारा" . असा वरून आवाज आला आणि नंतर खिक खिक करून कोणीतरी कुत्सित हसले..मला घनदाट संशय त्या सुर्याचाच आहे..
- प्रशांत 😃
No comments:
Post a Comment