बोधीसत्व कथा-#२
एकदा एक प्राध्यापक बोधिसत्वाकडे सल्ला मागायला जातो, बोधिसत्व चहा करत असताना हा प्राध्यापक त्याच्याशी तावातावाने चर्चा करत असतो. चहा तयार झाल्यावर बोधिसत्व एक कप त्या प्राध्यापकाच्या हातात देऊन त्यात चहा ओतायला सुरुवात करतो : चहाचा कप काठोकाठ भरला तरी चहा ओततच रहातो. शेवटी न राहून तो प्राध्यापक म्हणतो अहो महाशय कप भरला आहे आता त्यात अधिकचा चहा कसा मावेल ? त्यावर बोधिसत्व उत्तर देतो की ,तू या कपासारखाच आहेस विचारांनी भरलेला मग मी सांगितलेले विचार तू कसा स्वीकारशील? आधी रिकामा हो मग त्यात काही नवीन भरता येईल..☺️
💡--नवीन विचार समजून घेण्यासाठी मनाची पाटी कोरी करावी लागते. मनात पूर्वग्रह ठेऊन ऐकताही नीट येत नाही आणि नवीन स्वीकारले जात नाही.
☺️-प्रशांत
No comments:
Post a Comment