बोधिसत्व कथा-#१
अस्सं ?
एकदा एका गावातील एक अविवाहित तरुणी प्रेग्नन्ट रहाते. या पापाचा धनी कोण? आईवडील आणि गावकरी विचारतात..ती तरुणी बोधिसत्वाकडे बोट दाखवते.
सगळ्या गावात बोधिसत्व एक सदाचारी आणि ज्ञानी माणूस म्हणून ओळखला जात असे. त्या तरुणीच्या आईवडिलांना प्रचंड संताप येतो.. एका सज्जन समजलेल्या माणसाने अस कृत्य करावे?? ते त्याला जाब विचारतात..बोधीसत्व त्याना म्हणतो ....अस्सं?
यथावकाश ती तरुणी बाळंत झाल्यावर ते बाळ बोधीसत्वाकडे सुपूर्द केलं जातं..तुमचं पाप तुम्हीच सांभाळा.. बोधिसत्व परत एकदा अस्सं म्हणतो आणि ते बाळ स्वीकारतो त्याचे लालन पालन करतो.
यथावकाश त्या तरुणीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.गावातील एका तरुणाला वाचवण्यासाठी तिने बोधिसत्वावर खोटा आळ घेतलेला असतो.
ती तरुणी परत बोधिसत्वाकडे जाऊन त्याची क्षमा मागून ते बाळ परत मागते
बोधिसत्व अस्सं म्हणून तीच बाळ तिच्याकडे परत सुपूर्द करतो..
√ निष्कर्ष- मान आणि अपमान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण प्रामाणिक असू तर जग तुमच्या विषयी काय म्हणते काय बोलते याची काळजी करू नका. संयम दाखवला तर सत्य प्रकाशात येते. सत्य झाकोळले जाते नष्ट होत नाही. कर्तव्य करा मोह नको पुण्याचा आणि पापाचाही...☺️
अत्त दीप भव....
-प्रशांत 😌
No comments:
Post a Comment