जवानी जानेमन...☺️
अजूनही कोणी प्रेमात पडेल
अस का वाटत तिला?
अजूनही कोणी पटेल
अस का वाटत त्याला?
अजूनही तो हँडसम
अस का भासते तिला?
अजूनही ती सुंदर
अशी का दिसते त्याला?
फक्त तीच जगात सुंदर
अस का वाटत त्याला?
फक्त तोच आणि तोच
का वाटतो बरा तिला?
चाळीशी क्रॉस झाली की ना
असच होत असाव वाटतं
वयाचा पकडून घट्ट हात
थाम्ब ना रे म्हणावं वाटत..
निसटू पहाणारे पकडताना
होते मोठी मग घालमेल
वय आणि तारुण्याचा
कसा बसावा ताळमेळ?
मग केसांना लागतो कलप
मिश्याही होतात काळ्याभोर
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर
मेकअप चे थरावर थर
काका म्हटल जर कोणी
मन थोडं खट्टू होत..
दुधाची तहान ताकावर
मग काकूवर लट्टू होत
मिलिंद सोमण रोल मॉडेल
लुककुक दिवा अंधारात
पेला अर्धा भरला आहेच
तसा मी अजून तारुण्यात
तिकडेही काही नसते
फार काही वेगळे
वार्धक्याच्या बालपणाला
तारुण्याचे ठिगळे
साडीमधली बर्फी मग
जीन्स मध्ये येते
फॅन्सी टॉप पेहरून
टॉक टॉक करत जाते
नाही म्हटले तरी
नजर वळतेच मग त्याची
ओह ओल्ड वाइन इन न्यू बॉटल
खात्रीच पटते त्याची
अशा या गंमती जमती
आजूबाजूला घडतात
वय गेल्यावर काही माणसे
म्हणे वयात अशी येतात
-© प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment