Ad

Monday, 16 October 2023

..कडून...कडे...

".....कडून....कडे.."

अखेर हद्द पार करून
तुझ्या तप्त श्वासांशी
 माझ्या अधीऱ्या श्वासांचा
थरथरता मेळ साधत...
मान किंचित तिरपी करून
अखेर मी ते घेतलेच..

मी घेतले ? की तू दिले?
याची उत्तरे शोधत
तुझ्या मखमली ओठांची 
मखमल टीपत,
थोडे धीट होत
थोडे संकोचत
अखेर मी ते घेतलेच

ते घेतले तेव्हा..
पेशींची फुलपाखरे झाली
शरीराची सतार झाली
मिटल्या पापण्यात तुझ्या
मिलनाची आस दिसली

तू प्रतिआक्रमण केलेस
अन मी सरेंडर झालो..
हवा हवासा पराभव
हव्या हव्याशा जखमा
हरण्यात पण किती असतेना
हवी हवीशी मज्जा..

हे अलवार क्षण..
हे जीवा शिवाचे ऐक्य
अनेक आरोह अवरोहातून
हे असे समेवर येणे..
अरेच्चा ही तर शिवोsहं अवस्था
ओशो म्हणाला होता ना
तीच ही समाधी...
तीच ही मुक्ती..
क्षणभराची का होईना
ही मुक्तीच नाही का?
विलग होताना ..
तुला मला पडलेले 
तेच ते आदिम प्रश्न
.
.
ओशो किंचित हसला तेव्हा..

-© प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...