Ad

Saturday, 25 February 2023

कसक

तुला ना कधी कळावी
भावना माझ्या मनातली
कसक अंतरातली
तशीच राहू दे...

मी आठवतो नित्य तुला
हे तुला कळू नये कधी
आठवण तशीच मला
हृदयी जपू दे...

तू जवळ नकोच कधी
दूर आहेस तेच ग बरे
विरहाचे दुःख हवेहवेसे
मनसोक्त भोगू दे...

देहसुख झडो बापडे
स्पर्शात काय एवढाले
स्पर्श तुझ्या आठवांचा
कण कण मोहरू दे...

कोण मी कुठला ?
न जुळती पार्थिव बंध
तरी एक अनुबंध
आत मला जखडू दे

दिसण्याशी तुझ्या
काय माझे देणे घेणे
तुझे केवळ असणे
माझ्यात फुलून येऊ दे..

प्रेम आहे तुझ्यावर
हे काय नव्याने सांगणे
उत्तराशी काय देणे घेणे
हे एकदा तुला कळू दे

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...