Ad

Friday, 24 February 2023

निज शैशवास जपणे

निजशैशवास जपणे...

रडत खडत जगण्याचा
अट्टाहास का बरे?
केवळ श्वास जपण्याचा
ध्यास हा का बरे?

विकल सकल देह जरी
देहभुल काही जाईना
चपल चंचल मन बावरे
आवरीता आवरेना

संगती व्याधींची रोज
पडते त्यात नवीन भर
तरी न ओसरावा कधी
तारुण्याचा वसंत बहर

अमर अजय मोह हा
खेळवीतो तन मनाला
अटळ अलय नियती
फिरविते जन्मचक्राला

फिरून तरुण होण्याचा
वेडाचार हा बरा नव्हे
ओढून ताणून तारुण्याचा
मुखवटा हा खरा नव्हे

बाल सुलभ भावनेने
जग हे नित्य पाहणे
वृध्दत्वी निज शैशवास
असू दे रे नित्य जपणे

-प्रशांत
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...