अगम्य..
आतला एकांत हा
किती बरे आकांत हा
भय माझेच मला
तरी कसा निवांत हा
मिटले डोळे जरासे
मिटलो न मी जरासा
तूटले न पाश किंचित
वल्गनेचा किती जलसा
भयकारी कर्मभूतांचे
थैमान आत चालले
जे केले भूतकाळी
ते समोरच उभे ठाकले
ते कठोर नग्न सत्य
जेव्हा गर्जत उभे राहिले
पार पोकळ अध्यात्म माझे
पाचोळ्यागत उडून गेले
कसले दांभिक जप ते
अन कसले ते कर्मकांड
कुचकामी वेसणीला
का जुमानेल हो सांड
शतजन्माचे काय पांग
फेडशील का एकाजन्मी
नुसतेच कर्मकांड देईल का
या जन्माची तरी हमी ?
एकांत पुसतो मला हे
प्रश्न अति जीवघेणे
बरे असतेच ना अन्यथा
अज्ञानी मस्त रमणे
आहे सभोवती चिखल
तरी भासे हा नीरसागर
खंत तर अजिबात नाही
फुटो वा विरघळो देहघागर
अंश जर मी भगवंताचा
मज खंत कशाची असावी
नसो नौका नोहाची पण
एक होडी कागदी असावी
कळली जर का ही कविता
बुद्धीमान भलतेच तुम्ही
ना कळली तरी नसो खंत
कळेल हो ती पुढील जन्मी
आमेन..ओम शांती ...😊😊
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment