केवळ योग्य जागी योग्य बुद्धिमत्तेचा माणूस असून चालत नाही ..त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे लागते. पहिल्या टर्मला मनमोहन सिंगना तसे होते म्हणून पहिल्या टर्मला ते जागतिक पातळीवर प्रभावी व्यक्ती म्हणून टाइम्स ला त्यांची दखल घ्यावी लागली .पण दुसऱ्या टर्मला पक्षांतर्गतच त्याना दुय्यम स्थान मिळाले आणि त्या टर्म मध्येच त्यांची लोकप्रियता झपाटयाने खाली आली., इतकी की त्यांच्यावर अनेक विनोद व्हायरल झाले.बुद्धीमान माणसाची ही शोकांतिका म्हणावी लागेल.
बुद्धिमान माणसांची जागा चुकते हे अगदी महाभारत काळा पासून चालू आहे..पितामह भीष्मांची जागा चुकली, विदुराची विद्वत्ता आणि कर्णाचे शौर्य वाया गेले, उलट पांडवांनी यादव सेना नाकारली आणि योगेश्वर कृष्णाला निवडले ...आणि युद्ध जिंकले...शिवाजी महाराजांची माणसे निवडायची आणि त्यांचे पोस्टिंग करायची पद्धत असामान्य होती....खुद्द नियतीने योग्य वेळी छत्रपतींना जन्माला घालून अफलातून टायमिंग साधले आणि भारताचेच कोटकल्याण केले हे नक्कीच
तात्पर्य योग्य जागी योग्य बुद्धीमत्तेचा आणि निर्णय स्वातंत्र्य असलेला माणूस असणे सर्वांच्या हिताचे असते.
- प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment