डोहाळे जेवण...
आले भरत दिवस
पडे कसली ग भूल
गोड धक्के पोटामध्ये
बाळ देतो ग चाहूल
कसे असेल ग ते
माझे गोड गोड बाळ
ते असेल का शांत
की असेल ते वादळ
कोणासारखे असेल ते ?
त्याच्या बाबा सारखे?
की बाळ असेल ग
थेट माझ्या सारखे?
बाबा म्हणेल की?
म्हणेल प्रथम ते आई?
प्रश्न पडतो मला
सारखाच ग बाई
बाळा तुझ्या स्वागताची
किती केली रे तयारी
तुझ्या आगमनाची
वाट पहातात सारी
ये हसत जन्माला
दोन जन्म एका वेळी
एक बाळ म्हणून तुझा
एक आई मी वेगळी
आता जन्माला येईल
माझा सावळा ग कान्हा
रूप पाहता गोजिरे
मला फुटेल ग पान्हा
किंवा येईल ग माझी
सोनूली माझी राणी
मन आईचे ग गाते
बालजन्माची ग गाणी
आज डोहाळे जेवण
तृप्त आत हो रे बाळा
घास चिऊचा भरवीन
जेव्हा जन्मा येशील तू बाळा
जेव्हा जन्मा येशील तू बाळा
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment