आक्रीत...
सूर्य उगवला पश्चिमेवर
उलटी गंगा गंगोत्रीवर
सारितेस मग सागर मिळाला
आक्रीत घडले या धरेवर..
मुंगी गिळते मेरू पर्वत
सूर्य फेकतो किरणे शितल
चांदणे करते लाही लाही
चन्द्र जाळतो अवघे भुतल
कावळयांचे मधुर गायन
कोकील करतो बेसूर रुदन
भुंकती जागती बेरकी मांजरे
म्याव करती अवघे श्वानजन
जुंपल्या गाई त्या नांगराला
बैलांचे मग गोठ्यात दोहन
मोर थिजले जागीच क्षणभर
लांडोर करते बेफाम नर्तन
लग्न लागता खुषीखुषीने
बाया बदलती नवऱ्याचे नाव
बाप्याना मग लागती डोहाळे
बाया देती मिशिवर ताव
पोपट लपले ढोलीत आणि
घुबडे डोलती मस्त दांडीवर
भरदिवसा फिरती वाघूळे
अन चिमण्यांचा रात्री संचार.
डंख विखारी गांडूळाचे
अन सापांचे विष हरवले
झडली नखे वाघांची अन
हरिणांनी सिंह फाडले
तिथे सागरी विचित्र जाहले
माशांनी तिथले बगळे धरले
अन चोचीसकट बगळ्याना
माशांनी त्या स्वाहा केले..
असे सगळे उलटे पालटे
एकांती मी इश्श म्हणालो
जवळ येताच बायको
चला ना गडे बोलून गेलो
बोलून गेलो मी झोपेत
बायकोने मग तेच ऐकले
दळभद्री मेलं लक्षण ते
बायकोने मग नाक मुरडले
तेव्हाच कळले मला गड्या
हे सगळे तर स्वप्नच होते..
सगळं होत जागच्या जागी
हे सगळे मनाचे खेळच होते
-प्रशांत श.शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment