Ad

Sunday, 3 April 2022

जुगाड

जुगाड...

पुन्हा मोहोर...पुन्हा बहर
पुन्हा जिभा ला ला लपलप
पुन्हा लाजणे पुन्हा मोहणे
पुन्हा आपली उगाच धकधक

पुन्हा दिवा मिणमिण
पुन्हा उजेड क्षणभर क्षीण
घरंगळले सूर तरीही
झंकारते का उगाच वीण ?

शब्द करती साखरपेरणी
चिमणीला मग गरूडपंख
फुत्काराचे भास उगाचच
गांडुळांचे उगाच डंख...

कित्येक आल्या साभार परत
कित्येक गर्भातच गेल्या
कित्येक  वह्या  चुलीत गेल्या 
अन कित्येक  रद्दीत गेल्या...

लेखणी उचलता क्षणभर,
क्षणांत कविता उतरे झरझर
असे कविराज उदंड इथे,
आपण कसले येथे टीचभर ?

तरी कधीतरी उघडेल दार
अन उजेड आत येईलही
जुगाड करता करता शब्दांचा
कविता एखादी जमेलही...

- प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...