Ad

Wednesday, 23 June 2021

निज अंकुरे अंकुरे..

बीज अंकुटे अंकुरे...यावरून सुचलेले विडंबन


निज अंकुरे अंकुरे 
पेंगुळल्या लोचनांत
कसे निजावे बापड्यानी
अशा भर उकाड्यात

जिवा हवी मस्त गादी
अन उशीही उशाला..
भर वेगात फिरणारा
पंखा हवा छपराला
पण ऐनवेळी भरे
लायटीला हा वात
कसे निजावे बापडयानी
अशा भर उकाड्यात

डोळा लागता हो जरा
करी डास हा गुणगुण
कान इथेच माणसाचा
त्याला कशी कुणकुण ?
फटकावता त्याला फुटे
 आपलेच कानफाट
कसे निजावे बापडयानी
अशा भर उकाड्यात

घेता डोईवर  चादर
जीव होई कासावीस
जरा मोकळे झोपता
चावा घेती फार डास
डास मारता मारता
होई रात्रीचाच अंत
कसे निजावे बापडयानी
अशा भर उकाड्यात
निज अंकुरे अंकुरे 
पेंगुळल्या लोचनांत
कसे निजावे बापड्यानी
अशा भर उकाड्यात

😊-प्रशांत शेलटकर
 8600583846
24/06/2021

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...