दिदीचा सल्ला...😀
फार खोल माझ्यात
जायचेच नाही
इन- बॉक्सात माझ्या
यायचेच नाही
नियमित जेवते मी
काळजी कशाला?
जेवलीस का ?
कधी विचारायचे नाही
तुझी मॉर्निंग गुड
असू दे रे वेड्या
मला रोज गुड मॉर्निंग
करायचेच नाही
तशी मी निवांत
झोपते रे रात्री
तुझ्या गुड नाईटची
वेड्या गरजच नाही
तुझे हे बहाणे
ठावूकै ना मला
उगा जवळ येण्याची
वेड्या गरजच नाही
पडते आजारी मी
मी माणूस आहे
तुला काळजीची
वेड्या गरजच नाही
किती मी सुंदर ते
रोज आरसा सांगे मला
झाडावर हरभऱ्याच्या
चढवण्याचे काम नाही
गोड शब्दांच्या जिलेब्या
पाड तुझ्या तू कितीही
बुडवायला अरे मठ्ठा
इथे मिळणार नाही
जखमा खऱ्या खोट्या
उघड केल्यास तरी
लावायला मलम इथे
मिळणार नाही
जा सुखाने नांद
तुझ्या वॉल वर
इथे डोकवण्याचे
तुझे काम नाही..
✍️
-प्रशांत शेलटकर
मु पो गोळप
ता.जि. रत्नागिरी
8600583846
26/जून/2021
No comments:
Post a Comment