उद्याचा सूर्य
जायचंच तर इथून मित्रा
नक्कीच सर्वाना आहे
कधी गेलो कसा गेलो
प्रश्न हाच व्यर्थ आहे
धक्के असे जीवघेणे
अजून किती बसायचे
काल होता आज नाही
हेच आता सत्य आहे
काळजी घ्या रे स्वतःची
तेच आता हातात आहे
देवही झाले अगतिक आणि
राज्य फक्त यमाचे आहे
क्षणिक किती आयुष्य
ते आज कळते आहे
घेऊन कवेत अभाग्यांना
स्मशान अखंड जळते आहे
अंधार जरी सभोवताली
काळजात दिवा लावतो आहे
संपेल नक्की ही काळरात्र
सूर्य उद्याचा सांगतो आहे
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment