Ad

Friday, 14 May 2021

आजकाल

आजकाल


आजकाल काहीच कसं
मनाला भिडत नाही..
कोणावाचून कोण जाणे
आता काही अडत नाही

कित्येक दिवसात टचकन
डोळे भरून आलेच नाहीत
कोणासाठी कित्येक दिवसात
आत काही हललेच नाही..

ज्याच्यासाठी झुरावे असे
आजकाल कोणी उरले नाही
जिंकावे किंवा हरुन घ्यावे 
असे आता वाटतच नाही

शब्द-शब्द अडतात किती
कविता काही सुचत नाही
फुलवून शब्दांचा पिसारा
मनमोर काही नाचत नाही

सफल संपूर्ण आयुष्य
आता वाटते नकोनकोसे
हुरहूर लावणारे असे काही
आता वाटते हवेहवेसे...

✍️.....प्रशांत शेलटकर
           8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...