Ad

Sunday, 30 May 2021

विमोह

विमोह...

मी कशाला ग रचू
शब्दांचे मोहक सापळे
मनात  जपले आहे
नितळ नवे आकाश निळे

त्या नितळ नव्या आकाशात
ना चंद्र ना मोहक चांदण्या
ना कसली हवीशी हुरहूर
ना कसल्या गोड झिणझिण्या

मिळवावे काही हक्काने
असे काही वाटत नाही
गमवायचे काही आता
काही असे उरलेच नाही

तुझे असे सावध पवित्रे
 आता आहेत  व्यर्थ
हरण्या-जिंकण्यालाही आता
फारसे नाहीत अर्थ...

संशय असेल जर मनात
तर नकोच करू  मैत्री
दिसेल का सूर्यबिंब वेडे
अवसेच्या  घोर रात्री

हिशेबाची वही आता
चक्क मिटून ठेवली आहे..
आयुष्याची बॅलन्सशीट जणू
वरूनच जुळून  आली आहे

-✍️ प्रशांत शशिकांत शेलटकर
        मु.पो. गोळप रत्नागिरी
        8600583846
        30/05/2021

No comments:

Post a Comment

तीची डायरी

... तो गेल्यावर... तिची काळजी घेणारे खूपच.. घरातल्यापेक्षा बाहेरचेच जास्त.. घरात ती ओझे झालेली... तरी एक बरं आहे.. ती आहे स्वतःच्या पायावर उ...