पाठीत खंजीर नको
समोर गोड बोलू नको रे
मागून निंदा नको..
दिले तुला इतके की
मी हिशेब ठेवला नाही
कौतुक तुझे करताना
मी कधीच थकलो नाही
इतुका बोललो तुझ्याशी
मी बोलून थकलो नाही
तोललेले शब्द तुझे
मला कळलेच नाही..
मी उगाचच समजून गेलो
माझ्या जवळचे तुला
जवळचेच करतात घात
हे कधी ना कळले मला
जोवर होतो हुकमी एक्का
तोवर होतो देव तुझा
गरज संपली आता धक्का
म्हणे कोण रे तू माझा
जा आता निघून जा
मी आता आहे खम्बीर
परत कुणाच्या पाठीमध्ये
खुपसू नकोस पुन्हा खंजीर
-प्रशांत शशिकांत शेलटकर
मु पो गोळप ता.रत्नागिरी
8600583846
02/06/2021
No comments:
Post a Comment