झिम्माड..
आला पाऊस पाऊस
झोंबे झिम्माड गारवा
आता येणार ग साजरा
ऋतू हिरवा हिरवा...
आला पाऊस पाऊस
चिम्ब झाडं फुलं पाने
हरखली सृष्टी गाई
हिरवाईचेच गाणे...
आला पाऊस पाऊस
थेंब टपोर तिच्या गाली
राही थबकून तिथे
वेडा उतरेना खाली
आला पाऊस पाऊस
उभी झाडे थरारली
घरट्यात चिमणाबाई
पिसापिसांत भिजली
आला पाऊस पाऊस
दारी पागोळ्यांची नक्षी
दूर तिथे झाडावर
गुडूप झाले ग पक्षी
आला पाऊस पाऊस
गेला पाचोळा आभाळी
काळ्या निळ्या ढगांशी
वीजराणी देई टाळी
आला पाऊस पाऊस
तसा नेमेची तो येतो
पण कसा दरवेळी
नवा नवाच भासतो
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment