Ad

Monday 5 April 2021

सासू-सून

सासू-सून

नाते सासू-सुनेचे
जणू ढाल-तलवार
एक फक्त झेलते
दुसरी करते वार

काडीकाडी जमवून
एक विणते घरटे
पती आणि मुलांचे
एक विश्व तिचे होते

माहेरची आठवण
ती जपते डोळ्यात
माहेरच्या साडीला
लाखाची हो किंमत

ती असते तिच्या
किचनची हो राणी
अगदी चमच्याची हो
असते स्पेशल कहाणी

एके दिनी परंतु हो
येई दुसरीच परी
सुनेचे मग हिला
कौतुकच भारी

नव्याचे नऊ दिन
भर्रकन सरून जाती
नात्याचे मग नवेल्या
रंग फिके पडती

नव्या सूनबाईला मग
हवे वाटे स्वराज्य
नव्या नव्या विटेला
हवे नवेच मग राज्य

किचन मधली हवा 
मग हळूहळू तापे
स्वामीत्वाचा लढा मग
शिगेलाच पोचे

संसारासाठी म्हणे मी
काडी काडी केली
सुनेला म्हणे माझ्या  
माझी किंमतच नूरली

सून म्हणे सासूबाई
आता तुमचं राहुद्या
आम्हालाही  जरा आता
आमचा संसार करुद्या

दोन बायामध्ये होतो
असा जोरदार तंटा
दोघीमध्ये नवरोबा
काय करणार घंटा

आई म्हणते पोर माझा
बायकोचा झाला बैल
माझ्या समोर रुबाब करतो
बायकोला सोडतो सैल

बायको म्हणते नवरा माझा
आईच कुकुल बाळ
आई पुढे शिजत नाही
याची काही डाळ..

सासू-सुनांच्या तंट्याचा
मी काढला लसावी
प्रश्न एकच असतो
सम्राज्ञी कोण असावी?

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846




No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...