डोह
त्याचे गहिरे अंतरंग
शांत त्याच्या काठावर
ना कसले तरंग
खोल खोल डोह
त्याचा थांग लागत नाही
तोही मनातले काही
कधी बोलतच नाही
खोल खोल डोह
आत गहिरे खोल पाणी
घनगर्द तळाशी त्याच्या
साचली वेगळी कहाणी
खोल खोल डोह
त्याला ओझे होई पान
तरंगाची भाषा सांगे
जणू डोहाचेच मन
खोल खोल डोह
तळ त्याचा दिसेना
डोहाच्या वेदनेचा
थांग कोणा लागेना
खोल खोल डोह
त्याला एकांताचा शाप
डोह भोगतो जणू
गत जन्मीचे पाप
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment