पोटाचा झाला ग तुंबा
खेळ ना सखे तू झुंबा
वाढली किती ग चरबी
बेताने सगळं ग खा की
टाकु कसे? म्हणून खाऊ नको
आजाराला बोलावणे धाडू नको
सकाळी थोडे उठ लवकर
अंगणातच थोडं पळ भरभर
स्वयंपाक-पाणी ,धुण भांडी
याला कशी मारावी दांडी
पण हे सगळे ग एगझर्शन
एगझरसाईझला ना ऑप्शन
स्लिमट्रीम म्हणजे नव्हे फिटनेस
खाण सोडून येईल ना विकनेस
पाव, बिस्कीट ,टोस्ट आणि बटर
तब्बेतीसाठी नाहीच बेटर
खाण्यात असुदेत फळे लोकल
नको चायनीज हक्का न्यूडल
भांडू नको कायम हसत राहा
रुसू नको कायम हसत राहा
चौविसातला एक देऊन बघ
स्वतःसाठी एक तास जगून बघ
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment