भोगले जे आजवरी
वाटते सुखाचे भास होते
पाहिले जे आजवरी
वाटते ते स्वप्नांचे आभास होते
मेघ तुडुंब भरलेले
डोईवरून निघून गेले
वाटते फक्त सावलीचे
ते फक्त निमित्त होते
होते आकाश हक्काचे
अन चंद्रही होता हवा तसा
पण हाय रे माझ्या दैवा
आभाळ आलेले होते
रात्र फक्त सरत चालली
चांदण्यांचे व्यर्थ उसासे
आता जरी आभाळ मोकळे
तो भारलेला चद्र कुठे???
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment