Ad

Thursday, 1 April 2021

वर्णव्यवस्था

वर्णव्यवस्था ही नैसर्गिक आहे,जातीव्यवस्था ही कृत्रीम आहे.वर्ण म्हणजे केवळ रंग नव्हे वर्ण म्हणजे वृत्ती.वृत्ती या उपजत असतात.त्या जन्मावर आधारित नसतात.मूलतः ज्ञान संपादन करणे आणि दान करणे ऐहिक गोष्टींविषयी फार ओढा नसणे म्हणजे ब्राह्मण,मूलतः अंगात शौर्य,पराक्रम, सत्तासंपादन करून ऐहिक भोग घेण्याची वृत्ती म्हणजे क्षत्रिय,मूलतः व्यापार करून धन संपादन करण्याची वृत्ती म्हणजे वैश्य ,आणि मूलतः सेवा करण्याची वृत्ती म्हणजे शूद्र...शूद्र म्हणजे क्षुद्र नाही..मुळातच यात कोणी उच्च आणि नीच नसतेच..उपजत वृत्तीना तुम्ही उच्च नीच ठरवणार तरी कसे? ती बाय डिफॉल्ट आलेली असते.
      जागतिक स्तरावर काही उदाहरणे नक्कीच सांगता येतील . वृत्ती म्हणून बघा.
       आइन्स्टाइन - ब्राह्मण
       नेपोलियन- क्षत्रिय
       बिल गेट्स- वैश्य
       मदर तेरेसा- शूद्र

     वर्णव्यवस्था कधीच वाईट नसते.ती निसर्गनिर्मित आहे.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही त्या वृत्तीना दिलेली नावे आहेत. मग समान त्या वृत्तीचे समुदाय बनत गेले.त्यानुसार व्यवसाय निर्माण झाले मग स्वतःच्या समुदायाचे हित सांभाळण्यासाठी जाती निर्माण झाल्या. पुढे त्याच्यात उच्चनीच निर्माण झाले ,संघर्ष निर्माण झाले..आणि हे जगात सगळीकडे झाले.
    व्यवसायिकांना जशी आपल्या व्यवसायात स्पर्धा नको असते तशीच तत्कालीन जातीव्यवस्थेत पण स्पर्धा नकोशी झाली.मग एका जातीतून दुसऱ्या जातीत जाणे अवघड झाले.हुशार लोकांनी त्याला धर्माची चौकट दिली.स्वतःच्या समुदायाचे वेगळेपण जपण्यातूनच श्रेष्ठत्वाची भावना निर्माण झाली. पुन्हा एकदा हे सर जागतिक स्तरावर झाले.
     आताही नव्या जाती निर्माण होत आहेत.कापड विक्री करणारे दुसऱ्या ला त्यांच्या धंद्यात प्रवेश करू देत नाहीत.राजकीय नेते आपल्या बिरादारीच्या बाहेर नेतृत्व देत नाहीत..एखाद्या क्षेत्रात विशिष्ठ उद्योग समूहाचीच मोनोपॉली असते म्हणजे एक नवीन जातच असते ना..?
भांडवलशाही,साम्यवाद,समाजवाद या नवीन जाती बनू पाहत आहेत. स्वतःच वेगळपण जपण्याची वृत्ती मानवजातीच्या जन्मापासून अंता पर्यंत कायम राहील..फक्त त्याच्या चौकटी बदलत राहतील... वर्णव्यवस्था नैसर्गिक आहे ती राहणार..जातीव्यवस्था vertical मोड वरून  horizontal मोड ला गेली तरी खूप झालं...

प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...