ज्याला जसं...
ज्याला जसं जगावं तस
त्याला तस जगू द्यावं
जस ज्याचं मत तसच
ते राहू द्याव...
वादे वादे जायते तत्वबोध:
हे आता जुने झाले..
आता इथे प्रत्येकाचेच
आज्ञाधारक झोंबी झाले
पांढऱ्या वरची काळी अक्षरे
नेहमीच नसतात खरी....
विश्वास ठेवू नयेच कधी
मोठा माणूस असला तरी
लिहिणारे लिहीत जातात
वाचणारे वाचत जातात
वाचता वाचता कधी कधी
मेंदू गहाण ठेवून जातात
देश काल परिस्थिती
प्रत्येक वेळी वेगळी असते
लिहिताना आणि वाचताना
याचे कुठे भान असते.
अमुक साली अमुक नेते
अस अस म्हणाले...
ज्याअर्थी "ते "म्हणाले
ते बरोबरच म्हणाले...
बघता बघता माणसाचा
असा काही झोंबी होतो
सोशल मिडियावर मग
सामना कसा जंगी होतो
भांडणारे भांडत जातात
जाती पातीत फुटत जातात
उरात जपलेली नाती मग
बघता बघता तुटत जातात
म्हणून.....
ज्याला जस जगावं
तसं त्याला जगू द्यावं
जस ज्याचं मत तसच
ते राहू द्याव...
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment