Ad

Friday 3 July 2020

निर्भय

निर्भय

चुकवून यमाचा डोळा
मी दबकतच चाललो...
हलकेच घेत कानोसा
मी थबकतच चाललो

पण भलताच लबाड तो
अवचित समोर आला
How are you dear?
पटकन बोलून गेला

I am ok, fine
पटकन बोलून गेलो
चावून जीभ दाताखाली
मी जरा हळहळलो...

See you again
तो काहीसा पुटपुटला
काढून खिशातून रुमाल
मी घाम जरासा टिपला

हसून कसेतरी त्याला
मी बाय बाय केले..
का कोण जाणे पायातले
त्राणच निघून गेले...

चालताना मग मध्येच
तो कृष्ण अवचित भेटला
Don't be silly यार
मस्त हसून म्हणाला

जे झाले जुने ते...
लयास जाणार आहे..
पुन्हा नव्याने सारे
जन्मास येणार आहे...

चैतन्य अमर आहे..
देह हा विनाशी..
देह हे वस्त्र आत्म्याचे
जाणीव ठेव मनाशी

वस्त्रे फाटकी जुनी
जशी टाकतोस तू
Exactly आत्मा करतो तसेच
 जरा ऐक ना तू


कृष्ण असे काही बोलला
मी क्षणात हलका झालो
कधी नव्हे तो इतका
आतून पार हललो

झाले उदंड अर्जुन इथे
कृष्ण दुर्मिळ झाला
जसा भेटला मला
तसा भेटो तुम्हाला

आता ये "यमूटल्या"
तुझाच पापा घेतो..
वाटलं तर तुला मीच
गोड झप्पी देतो...

प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...